भरती प्रक्रिया :-
पदाचे नाव | कायदे /विधी सल्लागार |
पदे | १ |
नौकरी जागा | जळगाव |
वयोमर्यादा | ७० वर्ष |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटी तारीख | १० जानेवारी २०२४ |
शिक्षण | pdf वाचा |
भर्ती | इंटरव्यू |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
तापी पाठबंधारे विकास महामंडळ जळगाव नियामक मंडळाच्या ६६ व्या बैठकीच्या मंजूर ठरावानुसार तापी पाठबंधारे विकास महामंडळाच्या कायदे विषयक विधी सल्लागार पदावर सेवानिवृत्त न्यायधीश यांची करार पद्धतीने नेमणुकीचे अर्ज मागवित आहे.
कार्यकारी संचालक, तापी पाठबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचे कार्यालयातर्गत जळगाव, धुळे नंदुरबार, व नाशिक या जिल्हा करीताचे एकत्रितपणे सर्व प्रकारची न्यायालयीन कामकाजाकरिता अनुभवी सेवानिवृत्त न्यायधीश यांची पूर्णवेळ महामंडळाच्या मुख्यालयी कायदे/विधी सल्लागार या पदी कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करावयाची आहे.
अनुभवी सेवानिवृत्त न्यायधीश यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने अकरा महिनेसाठी करावयाची आहे. कायदे/विधी सल्लागार उमेदवार हा किमान निवृत्त जिल्हा न्यायधीश असणे आवश्यक आहे. इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज शिक्ष अर्हता/ अनुभव व इ. पूरक कागद पत्रासह अधीक्षक अभियंता, जळगाव पाठबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव यांचा कडे दि. १०/०१/२०२४ (सायंकाळी ५.०० वाजे पर्यत ) प्राप्त होईल या प्रमाणे टपाल द्वारे किंवा प्रत्यक्ष सादर करावीत.
अर्जाचे पाकिटावर “सेवानिवृत्त अनुभवी सेवानिवृत्त न्यायधीश यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहून अर्ज सादर करावा. तसेच अर्जासोबत आपले नाव व संपूर्ण पत्ता असलेले दोन (२ ) रिकामे लिफाफे रुपये ३०/- इतके रकमेचे पोस्ट तिकीट चिकटवून अर्जासोबत सादर करावेत. उपरोक्त दिनांका नंतर परप्र झालेला अर्जाचा व अपूर्ण असलेला अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. सदर नेमणुका महामंडळ स्तरावरील निवड समिती मार्फत पात्र उमेदवारांच्या मुलाखती द्वारे करण्यात येतील. सदर नेमणुकांचे आदेश हे शासनाच्या मन्यते नंतरच निर्गमित करण्यात येतील.
संवर्ग विवक्षित कामाचा | विवक्षित कामाचा तपशील |
अनुभवी सेवानिवृत्त न्यायधीश विधी सल्लागार (०१ पद) | भूसंपादन , आस्थापना, कंत्राटी विषयक व इतर विविध प्रकारणी दिवाणी /जिल्हा /ओद्योगिक /कामगार /उच्च /मट/सर्वोच्च न्यायालयात येथे सुरु असलेल्या याचिका व उपरोक्त कामां करिता कायदे विषयक सल्ला देण्यासाठी कायदे/विधी सल्लागार आवश्यक आहे. |