भरती प्रक्रिया :-
पदाचे नाव | आरोग्यसेविका (ए.एन.एम.). |
पदे | २६ |
शिक्षण | .एन.एम. (ANM) कोर्स उत्तीर्ण, एमएमसी नोंदणी आवश्यक. |
वयोमर्यादा | १८-३८ वर्ष |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
वेतन/मानधन | दरमहा रु.१८,०००/-पर्यत |
भर्ती प्रक्रिया | टेस्ट आणि इंटरव्यू |
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख | १ जानेवारी २०२५ |
अर्ज करण्याची शेवटी तारीख | ८ जानेवारी २०२५ |
आर पत्ता | नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१. |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
अटी व शर्ती :-
अनुभवाच्या बाबतीत खाजगी व शासकीय अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. (अनुभव प्रमाण पत्रावर अनुभवाचा कालावधी , दिनांक,स्वाक्षरी,स्टंप, आवक-जावक क.इ. बार्बीच्या योग्य उल्लेख असावा. अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करूनच अनुभवाचे गुण देण्यात येतील.)
सदर पदांकरिता शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार नाही.
मेरीट लिस्ट नुसार व अनुभवाचा आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
सदरील पदे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही. पदांसाठी वेतन हे एकत्रित मानधन आहे.
वरील सर्व पदे हि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
एकूण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणा मध्ये बदल होऊ शकतो.
सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपो आप संपुष्टात येतील.
अर्जा सोबत जोडावयाची शिक्षण कागदपत्रे :-
नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो -१ व स्वत:चा ई.मेल व दूरध्वनी क्रमांक.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाण पत्र.
प्रवर्गा मध्ये अर्ज करीत असल्यास जात प्रमाण पत्र.
जन्म तारखेचे प्रमाण पत्र (शाळा/ महाविद्यालय सोडलयाचा प्रमाण पत्र/ जन्माचे प्रमाण पत्र ).
ओळख पत्र -आधार कार्ड-मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसंस.
पदाकरिता लागणारी मूळ शिक्षण अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रिका व पदानुसार शासना मार्फत प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र व नूतनीकरण.
पदाकरिता लागणारी मूळ शिक्षण अर्हते शिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी (PG Degree) आणि पदव्युत्तर पदविका (PG डिप्लोमा ) प्रमाणपत्र.
उच्चच शिक्षण अर्हता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणा नुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग )अर्जा मध्ये स्पष्ट पाने नमूद करावा.
कोणत्याही वेळेस भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड समिती एन.यु.एच.एम.म.न.पा. नागपूर यांना राहतील त्यावर कोणतीही हरकत /आक्षेप घेता येणार नाही.
आवेदन पत्र स्वीकृत/अस्वीकृत करण्याचे अधिकार, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करण्याचे अधिकार, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करण्याचे तसेच त्या बाबतचा अंतिम निर्णय घेण्य बाबतचे संपूर्ण अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा आयुक्त म.न.पा. नागपूर यांचे कडे राखून ठेवलेले आहे.
उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
निवड आलेल्या उमेदवाराने रुजू होताना विहित नमुन्यात रुपये १००/-च्या बॉंड पेपरवर करारनामा करून द्यावा लागेल.(सेवेदरम्यान करारनाम्याच्या अटी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.)
ज्या पदाकरिता बिंदू नामावली नुसार राखीव प्रवर्गास अनुसरून पदभरती जाहिरात दिल्या नंतर पुढील प्रक्रीये द्वारे अपेक्षित राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाण मध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान काल मर्यादेत राबविण्याचे अभियान आहे हि बाब लक्षात घेऊन ११ महिने कालावधीसाठी प्रतीक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल.
उमेदवारांना एकापेक्षा जास्त प्रवर्गा करिता अर्ज करता येणार नाही.
उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुद्ध कोणताही फोजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण :-
नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाचवा माळा.
छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर -४४०००१.
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१००/- व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१५०/- चे DD कोणत्याही राष्ट्रीय कृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट Corporation Integrated Health and Family Welfare Society, Nagpur Payble at Nagpur (A/C No. 60401911738, IFSC CODE MAHBOOO1195)यांचे नावाने अर्जा सोबत जोडण्यात यावा.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाण पत्राच्या छ्यांकित प्रतीसह नमूद अर्ज कार्यालयात सादर करावा. विहित वेळे नंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. रजिस्टर डाक द्वारे /कुरियर ने किंवा इ-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज समक्ष कार्यालयात सादर करावे, याची नोंद घेण्यात यावी.